Sameer Amunekar
नवरात्रीच्या आधी त्वचा स्वच्छ ठेवा. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचा वापर करून चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक टिकवा.
नवरात्रीसाठी हलका आणि ग्लोइंग मेकअप निवडा. फाउंडेशन, ब्लश आणि हायलाइटरचा योग्य वापर करून चेहऱ्याला आकर्षक लुक द्या.
आयलायनर, काजळ आणि मस्कारा वापरून डोळ्यांचे सौंदर्य वाढवा. गरबा किंवा दांडियासाठी शिमर आयशॅडोही वापरू शकता.
नवरात्रीत चनिया चोळी, घागरा, साडी किंवा सुंदर एथनिक कुर्ती परिधान करा. आरामदायी आणि रंगीबेरंगी कपड्यांमुळे तुमचा लुक अधिक खुलून दिसेल.
ऑक्सिडाइज्ड झुमके, नेकलेस, बांगड्या आणि मांगटिकाचा वापर करून पारंपरिक लुकला चारचाँद लावा.
वेणी, बन, कर्ल्स किंवा ओपन हेअरस्टाइल ट्राय करा. केसांमध्ये गजरा किंवा आकर्षक हेअर ॲक्सेसरीज वापरून लुक अधिक सुंदर बनवा.
आउटफिटला साजेशा जुत्ती किंवा आरामदायी सँडल निवडा. सौम्य सुगंधाचा परफ्यूम वापरा, ज्यामुळे दिवसभर फ्रेश वाटेल.