Sameer Amunekar
ताजी मासळी, खोबरं आणि खास मालवणी मसाल्यांचा वापर करून तयार केलेलं मच्छीचं कालवण म्हणजे कोकणातील लोकप्रिय खाद्यपदार्थ. गरम भातासोबत याची चव आणखी खुलते.
तांदळाच्या पिठाच्या आवरणात गूळ आणि ओल्या नारळाचं सारण भरून बनवलेले उकडीचे मोदक कोकणातील खास गोड पदार्थ आहेत. गणेशोत्सवात या मोदकांना विशेष महत्त्व असतं.
कोकम आणि नारळाच्या दुधापासून तयार होणारी गुलाबी सोलकढी जेवणाची रंगत वाढवते. तिची आंबट-तुरट चव आणि नारळाचा स्वाद कोकणी जेवणाची खास ओळख आहे.
तांदळाच्या पातळ पिठापासून तयार होणारे मऊ, जाळीदार घावणे हा कोकणातील लोकप्रिय नाश्ता आहे. नारळाची चटणी किंवा गोड नारळाच्या दुधासोबत ते छान लागतात.
मसालेदार मालवणी चिकन करी आणि तांदूळ, डाळींच्या पिठापासून बनवलेले तळलेले वडे यांची जोडी म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच! हा पदार्थ कोकणातील अनेक भागांत आवडीने खाल्ला जातो.
कोकणात मुबलक मिळणाऱ्या फणसापासून बनवली जाणारी मसालेदार भाजी हा पारंपरिक शाकाहारी पदार्थ आहे. खोबरं, मसाले आणि फणसाचा खास स्वाद यामुळे या भाजीची चव वेगळीच लागते.
ओल्या नारळाचा किस आणि गूळ किंवा साखर वापरून बनवली जाणारी नारळाची वडी हा कोकणातील आवडता पारंपरिक गोड पदार्थ आहे. सण-समारंभात आणि पाहुणचारासाठीही ती बनवली जाते.