Weight Loss Tips: ना जिम, ना औषध! वजन कमी करण्यासाठी फॉलो करा 'हे' नैसर्गिक उपाय

Sameer Amunekar

वजन कमी करायचं आहे पण ना जिममध्ये जायचंय, ना औषधं घ्यायची आहेत? तर मग हे काही नैसर्गिक उपाय आहेत जे तुम्ही घरी बसून सहज फॉलो करू शकता.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

आहारात बदल करा

साखर आणि साखरयुक्त पदार्थ हे वजन वाढीचे मुख्य कारण असते. याऐवजी मधाचा किंवा गूळाचा वापर करा. ओट्स, फळं, भाज्या, डाळी – यामुळे पचनक्रिया सुधारते आणि भूक कमी लागते.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

पाणी भरपूर प्या

दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि चयापचय क्रिया सुधारते.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

हर्बल ड्रिंक्सचा वापर

गरम पाण्यात लिंबू आणि मध मिसळून सकाळी प्या. हिरव्या चहाचा नियमित वापर वजन कमी करण्यात मदत करतो. जिरे, धणे, मेथीचं उकळलेलं पाणी रात्री भिजवून सकाळी प्यायल्याने पचन सुधारते.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

पुरेशी झोप घ्या

रोज ७-८ तास झोप घेणं महत्त्वाचं आहे. झोप कमी झाली की भूक वाढते आणि खाणंही वाढतं.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

तणाव टाळा

तणावामुळे हार्मोन्स बिघडतात आणि वजन वाढतं. ध्यान, योग किंवा आवडते छंद जोपासणं – हे सगळं तणाव कमी करतं.

Weight Loss Tips | Dainik Gomantak
Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा