Sameer Amunekar
घराच्या भिंतींवर पाली फिरत असतील, तर काही नैसर्गिक उपाय करून त्यांना दूर ठेवता येईल. त्यापैकी एक प्रभावी उपाय म्हणजे विशिष्ट प्रकारची रोपं लावणे. या रोपांमध्ये असलेले नैसर्गिक घटक आणि वास पालींना दूर ठेवण्यास मदत करतात.
तुळशीच्या झाडाचा वास पालींना सहन होत नाही. घराच्या आसपास आणि खिडक्यांजवळ तुळस लावल्यास पाली घरात येणार नाहीत.
मिरीच्या झाडामधील तिखटपणा आणि वास पालींना त्रासदायक वाटतो. मिरीच्या पानांचा अर्क पाण्यात टाकून फवारणी केल्यासही फायदा होतो.
या औषधी वनस्पतीच्या झाडामुळे पाली घरापासून दूर राहतात. याचा अर्क फवारल्यास पाली लांब जातात.
लेमन ग्रासचा वास डास, कीटक, तसेच पालींना देखील त्रासदायक असतो. घराच्या आजूबाजूला लावल्यास पालींची संख्या कमी होते.
कढीपत्त्याचा वास पालींना आवडत नाही. कढीपत्ता झाड घरात किंवा बाल्कनीत लावल्यास पाली दूर राहतात.