Sameer Amunekar
हिवाळा असो वा पावसाळा किंवा उन्हाळा, सर्वच ऋतूत डासांनी थैमान घालून ठेवलं आहे. या डासांमुळे मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया सारखे जीवघेणे आजार बळावतात
तुळस डासांपासून बचावासाठी खूप फायदेशीर आहे. तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे ती डासांना दूर ठेवते. तुळशीच्या पानांमधून निघणारा सुगंध डासांना त्रासदायक वाटतो. त्यामुळे तुळस घराजवळ किंवा बाल्कनीत लावल्याने डास दूर राहतात.
झेंडूच्या फुलांमधील पायरेथ्रम (Pyrethrum) नावाचा घटक डासांसाठी विषारी मानला जातो. तो डासांना घराजवळ येऊ देत नाही. झेंडूच्या फुलांचा उग्र सुगंध डासांसह इतर कीटकांनाही त्रासदायक वाटतो. त्यामुळे झेंडूचे झाड घराभोवती लावल्याने डास कमी होतात.
नीमच्या पानांमधील वास आणि त्यात असलेल्या रसायनांचे संयुगे डासांसाठी त्रासदायक असतात. नीममध्ये नैसर्गिक डास प्रतिबंधक गुणधर्म असतात, ज्यामुळे डास दूर राहतात आणि डासांपासून होणाऱ्या रोगांचा (मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया) धोका कमी होतो.
पुदिन्याचा तीव्र सुगंध डासांना त्रासदायक वाटतो, त्यामुळे डास त्या परिसरात येत नाहीत. पुदिना इतर कीटकांना देखील पळवतो.
बरेच लोक घरामध्ये सुगंध दर्वळण्यासाठी लेमन ग्रास लावतात. डासांना पळवण्याच्या बहुतांश औषधांमध्ये लेमन ग्रासचा वापर केला जातो. लेमन ग्रासमध्ये सिट्रोनेला आणि लिमोनेन सारखे घटक असतात जे डासांना दूर ठेवतात.