Sameer Amunekar
निळेभोर समुद्रकिनारे, कोकणी संस्कृती आणि शांत वातावरणामुळे गुहागर हे एक आदर्श ‘हेरिटेज डेस्टिनेशन’ ठरत आहे.
जेट स्कीइंग, बंपर ट्यूब राईड आणि स्नॉर्कलिंगमुळे साहसप्रेमी पर्यटकांसाठी गुहागर आकर्षण ठरतो.
१२०० वर्षे जुन्या मंदिरासह हा समुद्रकिनारा अध्यात्म आणि शांततेचा अनुभव देतो.
गोपाळगड आणि जयगड किल्ल्यांवरून अरबी समुद्र व शास्त्री नदीचा संगम पाहणे अविस्मरणीय ठरते.
हेदवीचे दशभुज गणेश मंदिर, आंजर्लेचा कड्यावरचा गणपती आणि परशुराम मंदिर श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहेत.
परचुरी-मालदोली येथील क्रोकोडाईल सफारी, अबलोलीतील पक्षीनिरीक्षण आणि जवळील थिबा पॅलेस पर्यटकांना वेगळा अनुभव देतात.
महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर वसलेले गुहागर हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून, कोकणच्या समृद्ध संस्कृतीचा आणि नैसर्गिक वारशाचा आरसा आहे.