Sameer Amunekar
केमिकल असलेल्या फेसवॉशऐवजी कच्चे दूध किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करा. हे त्वचेच्या आतील छिद्रांमधील घाण काढून चेहरा खोलवर स्वच्छ करते.
हा पांढरा पदार्थ नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करतो. चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळल्यामुळे मृत त्वचा (Dead Skin) निघून जाते आणि चेहरा फ्रेश दिसतो.
यातील नैसर्गिक घटकांमुळे त्वचेवरील जादा तेल (Oil) शोषले जाते, ज्यामुळे पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते आणि त्वचा डागमुक्त राहते.
दिवसातून दोनदा हा उपाय केल्यास त्वचेतील लवचिकता टिकून राहते. यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे त्वचा काळवंडली असेल, तर हा पांढरा पदार्थ नैसर्गिक ब्लीचप्रमाणे काम करतो आणि त्वचेचा मूळ रंग परत मिळवून देतो.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी हा पदार्थ अत्यंत गुणकारी आहे. नियमित वापरामुळे डोळ्यांखालील त्वचा मऊ आणि उजळ होते.
कोणत्याही महागड्या फेशिअलशिवाय घरीच झटपट ग्लो मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. केवळ ५ मिनिटांत चेहरा टवटवीत आणि सतेज दिसू लागतो.