Homemade Facial For Glowing Skin: त्वचेला येईल नॅचरल ग्लो! रक्षाबंधनापूर्वी करा 'हे' 5-स्टेप होममेड फेशियल; दिसाल सर्वात खास

Sameer Amunekar

चेहऱ्याची स्वच्छता

रक्षाबंधनापूर्वी फेशियलची सुरुवात त्वचा स्वच्छ करण्यापासून करा. कच्चे दूध आणि दही यांच्या मदतीने चेहरा व मान हलक्या हाताने स्वच्छ करा.

Raksha Bandhan skincare | Dainik Gomantak

एक्सफोलिएशन

मृत त्वचा आणि चेहऱ्यावरील मळ दूर करण्यासाठी ओट्सचा सौम्य स्क्रब वापरा. ओट्स पावडरमध्ये मध आणि कच्चे दूध किंवा गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा.

Raksha Bandhan skincare | Dainik Gomantak

फेशियल मसाज

बदामाचे तेल किंवा ताजी दुधाची साय कोरफडीच्या जेलमध्ये मिसळा. या मिश्रणाने चेहरा आणि मानेवर काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.

Raksha Bandhan skincare | Dainik Gomantak

नैसर्गिक फेस पॅक

मुलतानी माती, बेसन, चंदन पावडर, चिमूटभर हळद आणि गुलाबजल एकत्र करून फेस पॅक तयार करा. चेहरा व मानेवर लावून १० ते १५ मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा.

Raksha Bandhan skincare | Dainik Gomantak

घरगुती सीरम

कोरफडीच्या गरात गुलाबजल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि थोडे ग्लिसरीन मिसळा. चेहऱ्यावर याचा पातळ थर लावा आणि सुकू द्या.

Raksha Bandhan skincare | Dainik Gomantak

त्वचेची काळजी घेताना हे लक्षात ठेवा

नैसर्गिक घटकही प्रत्येकाच्या त्वचेला मानवतीलच असे नाही. त्यामुळे नवीन मिश्रण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आणि जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर थांबवणे योग्य ठरेल.

Raksha Bandhan skincare | Dainik Gomantak

रक्षाबंधनासाठी ग्लोइंग लूक

या ५-स्टेप रुटीनमुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि ताजीतवानी दिसण्यास मदत होऊ शकते. मात्र त्वचेचा प्रकार लक्षात घेऊनच घटक निवडा आणि संवेदनशील त्वचा असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Raksha Bandhan skincare | Dainik Gomantak

Gloसकाळी 9 वाजण्यापूर्वी करा 'या' गोष्टी! मिळेल नैसर्गिक ग्लो

येथे क्लिक करा