Glowing Skin Beauty Secrets: सकाळी 9 वाजण्यापूर्वी करा 'या' गोष्टी! मिळेल नैसर्गिक ग्लो, तुमची जिवलग मैत्रीणही विचारेल ब्युटीचं सीक्रेट

Sameer Amunekar

कोमट पाणी

सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीराला हायड्रेशन मिळण्यास मदत होते आणि दिवसाची सुरुवात फ्रेश वाटते.

Morning Beauty Routine | Dainik Gomantak

चेहरा स्वच्छ धुवा

रात्री त्वचेवर साचलेली तेलकटपणा आणि घाण दूर करण्यासाठी सकाळी सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. त्वचा अधिक फ्रेश दिसण्यास मदत होईल.

Morning Beauty Routine | Dainik Gomantak

१० मिनिटे सूर्यप्रकाश घ्या

सकाळच्या सौम्य प्रकाशात काही मिनिटे वेळ घालवा. मात्र, उन्हाचा कडाका वाढण्यापूर्वी बाहेर पडणे आणि त्वचेवर सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे.

Morning Beauty Routine | Dainik Gomantak

पौष्टिक नाश्ता करा

नाश्त्यात फळे, कडधान्ये, अंडी, दही किंवा ड्रायफ्रूट्स यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. संतुलित आहाराचा त्वचेच्या एकूण आरोग्यालाही फायदा होतो.

Morning Beauty Routine | Dainik Gomantak

१०-१५ मिनिटे व्यायाम करा

योग, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहते. नियमित शारीरिक हालचाल तुमच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Morning Beauty Routine | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन विसरू नका

चेहरा धुतल्यानंतर त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर लावा. घराबाहेर पडताना ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरणेही महत्त्वाचे आहे.

Morning Beauty Routine | Dainik Gomantak

५ मिनिटे मेडिटेशन करा

सकाळी काही मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. तणाव कमी करण्यासाठी आणि दिवसाची सुरुवात शांतपणे करण्यासाठी ही सवय उपयुक्त ठरू शकते.

Morning Beauty Routine | Dainik Gomantak

मेधवी बिधुरी नेमकी आहे तरी कोण?

येथे क्लिक करा