Sameer Amunekar
बीटरूटमध्ये नैसर्गिक रंगद्रव्ये असतात. थोडा रस गालांवर अगदी हलक्या हाताने लावल्यास नैसर्गिक गुलाबी टिंट मिळू शकते.
कॉटनच्या मदतीने गुलाबपाणी चेहऱ्यावर लावा. त्वचेला फ्रेश आणि तजेलदार दिसण्यास मदत होऊ शकते.
डाळिंबाचा रस त्वचेवर लावण्यापेक्षा त्याचा आहारात समावेश करणे अधिक सुरक्षित पर्याय आहे. यामुळे त्वचेला आवश्यक पोषक घटक मिळतात.
दही आणि मधाचा सौम्य फेस पॅक त्वचेला मॉइश्चराइज करण्यास मदत करू शकतो. 10 मिनिटांनी चेहरा धुवा.
शुद्ध एलोवेरा जेल त्वचेला थंडावा आणि हायड्रेशन देऊ शकते. संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करा.
शरीर हायड्रेटेड ठेवणे त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा.
डाळिंब, बीटरूट, संत्री, पालेभाज्या यांसारख्या पोषक पदार्थांचा आहारात समावेश करा. संतुलित आहारामुळे त्वचा अधिक निरोगी दिसण्यास मदत होते.