Akshata Chhatre
सध्या हवामान सतत बदलत आहे. विशेषतः ऑयली स्किन असणाऱ्यांना विविध त्वचासंबंधी तक्रारी सतावत असतात.
महागडी फेशियल्स, केमिकल क्रीम्स किंवा सिझनल स्किन ट्रीटमेंट्स करूनही केवळ तात्पुरता फायदा होतो.
आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की सौंदर्यासाठी महागडे सौंदर्यप्रसाधन वापरण्याची गरज नाही. घरात असलेला बर्फच नैसर्गिक आणि सशक्त उपाय ठरतो.
रोज सकाळी आणि संध्याकाळी काही मिनिटं चेहऱ्यावर बर्फ फिरवणं त्वचेचं आरोग्य सुधारू शकतं.
ऑयली स्किनमुळे चेहरा चिकट, मळकट वाटतो. हे तेल रोमछिद्रांत अडकून ब्लॅकहेड्स व पिंपल्सची शक्यता वाढवतो.
सततचा ताण, झोपेचा अभाव आणि वाढतं वय हे डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांचे मुख्य कारण आहे.