Sameer Amunekar
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार, जीवनशैलीत बदल आणि काही वेळा औषधोपचाराची गरज असते. खाली काही उपयोगी उपाय दिले आहेत जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकतात.
मीठाचे प्रमाण कमी ठेवा. दिवसाला १,५००–२,३०० मिग्रॅ पेक्षा जास्त सोडियम टाळा. केळी, पालक, टोमॅटो, नारळपाणी पिल्यानं रक्तदाब कमी होतो. कॉफी व मद्याचे प्रमाण मर्यादित ठेवा.
आठवड्यातून किमान ५ दिवस, ३० मिनिटे चालणे, सायकलिंग, योगासने करा. ध्यान, योग, प्राणायाम, छंद जोपासणे यामुळे मन शांत होते. सिगारेट्समधील निकोटिनमुळे रक्तदाब वाढतो त्यामुळं धूम्रपान टाळा.
रोज सकाळी रिकाम्या पोटी १-२ लसूण पाकळ्या खाणे. मेथीचे दाणे रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी खाल्ले असता उपयोग होतो. रोज सकाळी १ चमचा आवळा रस पाण्यात मिसळून प्यावे.
जर रक्तदाब खूप जास्त असेल किंवा वंशपरंपरागत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधे घेणे आवश्यक आहे.
रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. उंच किंवा कमी रक्तदाब दोन्ही आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात.