Akshata Chhatre
पालींपासून घर सुरक्षित ठेवायचंय? बाजारातील कीटकनाशकांऐवजी काही नैसर्गिक झाडं उपयोगी ठरू शकतात आरोग्याला धोका न आणता.
पालींना तीव्र वास असह्य वाटतो. पेपरमिंटचं रोप किंवा त्याचं तेल घरात ठेवल्याने पाली घरात येत नाहीत.
कांद्याचा वास पालींना त्रासदायक वाटतो. त्याचे तुकडे खिडक्या, कोपऱ्यात ठेवले तर पाली दूर राहतात.
लेमनग्रासचा सुगंध पालींना अप्रिय वाटतो. कुंडीत किंवा डिफ्यूझरमध्ये वापरल्यास पाल लांब राहतात.
झेंडूमध्ये असणारे घटक पालींना दूर ठेवतात. त्याचबरोबर बाग आणि बाल्कनीला देखणंही करतात.
पेपरमिंट किंवा लेमनग्रास तेल पाण्यात मिसळून फवारणी करा. लसूण-कांद्याचे तुकडे पाली दिसणाऱ्या जागी ठेवा. झाडं खिडक्या, बाल्कनीजवळ लावा.