Akshata Chhatre
आजकाल केसांच्या समस्या खूप वाढल्या आहेत. बाजारातील महागडे प्रॉडक्ट्स काम करत नसतील, तर तुम्ही घरगुती नैसर्गिक उपायांचा वापर करू शकता.
हे तेल तुमच्या टाळूला निरोगी ठेवेल आणि केस मुळापासून मजबूत करेल.
तेल बनवण्यासाठी आवश्यक सामग्री; नारळ तेल,कच्चा कांदा, मेथीचे दाणे, कढीपत्ता, रोझमेरीची पाने, उकळत्या पाण्याच्या भांड्यावर नारळ तेल भरलेली दुसरी वाटी ठेवा.
हे तेल मंद आचेवर ४० ते ४५ मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ उकळू द्या. गॅसवरून उतरवल्यानंतर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा.
जर तुमच्याकडे वर्जिन कोकोनट ऑइल नसेल, तर तुम्ही सामान्य नारळ तेल थेट पॅनमध्ये गरम करून ही प्रक्रिया कमी वेळेत पूर्ण करू शकता.
हे तेल केसांना रात्रभर किंवा केस धुण्यापूर्वी किमान २ तास लावा, त्यानंतर केसांना सौम्य शॅम्पूने धुवा.
हे नैसर्गिक तेल तुमच्या केसांना मुळापासून पोषण देईल आणि केस गळती कमी करण्यास मदत करेल.