Sameer Amunekar
एलोवेरामधील नैसर्गिक घटक त्वचेला थंडावा देतात, लवचिकता वाढवतात व सुरकुत्या कमी करतात. रोज सकाळी किंवा रात्री चेहऱ्यावर लावा.
हळद अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल आहे. हळद, दही आणि मध एकत्र करून फेसपॅक लावल्यास त्वचा उजळते आणि सुरकुत्या कमी होतात.
मध त्वचेला नैसर्गिक आर्द्रता देते. आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर सौम्य मसाज करा आणि १५ मिनिटांनी धुवा.
कोरफड जेलमध्ये मध मिसळून लावल्यास त्वचा घट्ट होते व सुरकुत्यांवर परिणाम होतो.
थंड किंवा कोमट पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल शाबूत राहतात आणि सुरकुत्या लवकर येत नाहीत.
संत्रा, लिंबू, टोमॅटो यांचे रस त्वचेवर लावल्यानं त्वचा उजळते आणि सुरकुत्या दूर राहतात.
नियमित योगासने व प्राणायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते, त्वचा तजेलदार राहते आणि वयाच्या खुणा उशिरा दिसतात.