Manish Jadhav
कांद्यामध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असते. ते केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण वाढवते आणि केसांची वाढ जलद करते. तुम्ही आठवड्यातून 1–2 वेळा लावू शकता.
अॅलोवेरा ज्यूस केसांच्या मुळांना पोषण देते, कोंडा कमी करते आणि केस मऊ-चमकदार बनवते.
केसांना नैसर्गिक कंडिशनिंग मिळते. केस गळती कमी होते आणि केस लांब व मजबूत होतात.
डाळिंबाचा ज्यूसमधील अँटीऑक्सिडंट्समुळे केस तुटणे कमी होते. स्कॅल्प हेल्दी राहतो आणि केसांची नैसर्गिक चमक वाढते.
लिंबाचा ज्यूस अतिरिक्त तेलकटपणा आणि कोंडा कमी करते. लिंबाचा रस नेहमी पाण्यात मिसळूनच लावा.
पपईचा ज्यूस केसांच्या मुळांमधील घाण साफ करतो आणि केस जाड बनवण्यास मदत करतो. याशिवाय, केस गळती कमी करण्यासाठीही हा ज्यूस खूप उपयुक्त आहे.
व्हिटॅमिन C मुळे केस मजबूत होतात. केसांना नैसर्गिक शाईन मिळते आणि वाढीस चालना मिळते.