Sameer Amunekar
बटाट्यात नॅचरल ब्लीचिंग गुणधर्म असतात. कच्च्या बटाट्याचा रस काळ्या डागांवर लावल्याने पिगमेंटेशन कमी होऊन त्वचेला नैसर्गिक चमक येते.
स्वयंपाकघरातील १० रुपयांच्या बेसन आणि चिमूटभर हळदीमध्ये थोडे दूध मिसळून पेस्ट तयार करा. हे नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते आणि मृत त्वचा काढून टाकते.
ताजी कोरफड त्वचेसाठी वरदान आहे. रात्री झोपताना कोरफडीचे जेल चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्सची जळजळ कमी होते आणि त्वचा हायड्रेटेड राहते.
त्वचेचा ग्लो हा आतून येतो. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते.
पिंपल्सवर बर्फाने हलका शेक दिल्यास सूज कमी होते. हे पूर्णपणे मोफत आणि प्रभावी आहे, जे त्वचेचे पोअर्स घट्ट करण्यास मदत करते.
मऊ त्वचेसाठी साखर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण करून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ब्लॅकहेड्स निघून जातात आणि त्वचा चमकदार दिसते.
पिंपल्स घालवण्यासाठी चेहरा रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ धुणे अत्यंत गरजेचे आहे. धूळ आणि प्रदूषणामुळे होणारे डाग टाळण्यासाठी नैसर्गिक क्लेंझरचा वापर करा.