Akshata Chhatre
गुळाची तासीर उष्ण असते. दररोज थोडा गुळ खाल्याने थंडीपासून आराम मिळतो आणि शरीराचे तापमान संतुलित राहते.
गुळात लोह, झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे घटक सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यासाठी शरीराला ताकद देतात.
हिवाळ्यात पचन मंदावते. जेवणानंतर थोडा गुळ खाल्यास पाचक एन्झाइम्स सक्रिय होतात, ज्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.
गुळ हा लोहाचा नैसर्गिक स्रोत आहे. तो हिमोग्लोबिनची पातळी वाढवतो, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे आणि ॲनिमियासारख्या समस्या कमी होतात.
गुळ शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो. यामुळे रक्त शुद्ध होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते, तसेच पिंपल्सची समस्या कमी होते.
दिवसाला १० ते २० ग्रॅम गुळ खाणे पुरेसे आहे. गुळ तीळ, शेंगदाणे किंवा आल्यासोबत खाल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात.
गुळ आरोग्यासाठी चांगला असला तरी, मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.