Sameer Amunekar
सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट पाण्याने आणि 'सॅलिसिलिक ॲसिड' (Salicylic Acid) असलेल्या सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे रात्री त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल निघून जाईल.
चेहरा धुवून झाल्यावर शेवटी चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारा. यामुळे चेहऱ्याची उघडी छिद्रे (Open Pores) आकुंचन पावतात आणि तेल ग्रंथींवर नियंत्रण राहते.
कापसाच्या मदतीने अल्कोहोलमुक्त किंवा गुलाब पाण्याचा टोनर लावा. हे त्वचेचे पीएच (pH) संतुलन राखते आणि दिवसभर त्वचा फ्रेश ठेवण्यास मदत करते.
त्वचा तेलकट आहे म्हणून मॉइश्चरायझर लावणे सोडू नका. त्याऐवजी हलके आणि 'जेल-बेस्ड' (Oil-free) मॉइश्चरायझर लावा, जे त्वचेला हायड्रेटेड ठेवेल पण चिकट करणार नाही.
बाहेर पडण्यापूर्वी 'मॅट फिनिश' किंवा 'नॉन-कॉमेडोन्जेनिक' सनस्क्रीन नक्की लावा. यामुळे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण मिळेल आणि चेहरा जास्त तेलकट दिसणार नाही.
जर वेळ असेल, तर आठवड्यातून दोनदा फक्त ५ मिनिटांसाठी मुलतानी माती आणि गुलाबाच्या पाण्याचा लेप लावा. हे नैसर्गिकरीत्या जास्तीचे तेल शोषून घेते.
सकाळी उठल्या उठल्या १-२ ग्लास कोमट पाणी प्या. तसेच आहारात तेलकट आणि जास्त साखरेचे पदार्थ टाळा, ज्यामुळे त्वचेतून कमी तेल उत्सर्जित होईल.