Sameer Amunekar
रत्नागिरीपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेला गावखडी बीच अतिशय स्वच्छ आणि शांत आहे. गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
गावखडी किनारा ऑलिव्ह रिडले कासवांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कासवांच्या संवर्धनाचे काम केले जाते, जे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
येथील समुद्राची लाट आणि किनाऱ्याचा उतार तुलनेने सुरक्षित मानला जातो. त्यामुळे कुटुंबासोबत फिरण्यासाठी आणि समुद्रस्नानासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.
गावखडी किनाऱ्यावरील पांढरीशुभ्र वाळू आणि अथांग पसरलेला निळा समुद्र मनाला मोहिनी घालतो. फोटोग्राफीसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
या गावाच्या एका बाजूला अथांग समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला सुंदर खाडी आहे. संगमेश्वर आणि पावसच्या जवळ असल्याने येथील निसर्गसौंदर्य द्विगुणित होते.
गावखडी किनाऱ्यावरून दिसणारा सूर्यास्त (Sunset) अत्यंत विलोभनीय असतो. आकाशातील रंगांची उधळण पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून थांबतात.
येथे आल्यावर तुम्ही अस्सल कोकणी जेवणाचा आणि होमस्टेचा आनंद घेऊ शकता. ताजी मासळी आणि उकडीचे मोदक ही येथील खासियत आहे.