Manish Jadhav
कोरड्या आणि फाटलेल्या ओठांना मऊ करण्यासाठी मध हा सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे. मधामध्ये उत्तम मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे ओठांची त्वचा हायड्रेट करतात आणि नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतात.
ओठांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी पिठीसाखर किंवा बारीक साखर उत्तम स्क्रबर म्हणून काम करते. साखरेचे दाणे ओठांवर हलक्या हाताने घासल्याने त्वचा स्वच्छ होते आणि ओठ मऊ पडतात.
ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी आणि त्यांना नैसर्गिक गुलाबी रंग देण्यासाठी बीटाचा रस रामबाण मानला जातो. बीट आणि साखरेचे मिश्रण ओठांवर लावल्याने ओठांचा रंग कमालीचा सुधारतो.
मऊ आणि निरोगी ओठांसाठी खोबरेल तेलाचा वापर करा. स्क्रब करताना त्यात काही थेंब खोबरेल तेल मिसळल्याने ओठांना आवश्यक फॅटी ॲसिड्स मिळतात, ज्यामुळे ओठ मऊ आणि चमकदार बनतात.
अति उन्हामुळे किंवा इतर कारणांमुळे ओठ काळे पडले असल्यास लिंबाचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. लिंबामध्ये नॅचरल ब्लिचिंग गुणधर्म असतात, जे ओठांवरील काळे डाग हलके करण्यास मदत करतात.
रात्री झोपण्यापूर्वी किंवा स्क्रब केल्यानंतर ओठांना शुद्ध तूप लावल्याने ओठ फाटण्याची समस्या कायमची दूर होते. तूप ओठांचे पोषण करुन त्यांना नैसर्गिकरित्या मऊ आणि गुलाबी बनवण्याचे काम करते.
अति घाईत किंवा जोराने ओठांवर स्क्रब करु नका. आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा बोटांच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने 2 मिनिटे ओठांना मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने ओठ स्वच्छ करा.