Monsoon Trekking: पावसाची रिमझिम अन् डोळ्यांचं पारणं फेडणारा निसर्ग; जिगरबाज ट्रेकर्ससाठी सह्याद्रीचा राजा 'हरिहर किल्ला'

Manish Jadhav

हरिहर किल्ला

पावसाळ्यात हरिहर किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या खड्या पायऱ्यांवरुन ट्रेकिंग करणे म्हणजे अंगावर काटा आणणारा अत्यंत थरारक अनुभव ठरतो.

Harihar Fort | Dainik Gomantak

धुक्याची चादर अन् निसर्गाचे रौद्र रुप

पावसाच्या दिवसांत संपूर्ण गड आणि पायऱ्या धुक्यात हरवून जातात, जिथून खाली पाहिल्यावर सह्याद्रीचे विलोभनीय रुप मनाला भुरळ घालते.

Harihar Fort | Dainik Gomantak

हिरव्यागार शालूने नटलेला परिसर

पावसाळ्यात ट्रेकच्या सुरुवातीपासूनच आजूबाजूला पसरलेली हिरवीगार झाडी, छोटे धबधबे आणि निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना ताजेतवाने करते.

Harihar Fort | Dainik Gomantak

सुरक्षेची पूर्वकाळजी आणि योग्य ट्रेकिंग शूज

सततच्या पावसाने कातळ निसरडा होत असल्याने येथे ट्रेकिंग करताना उत्तम ग्रीप असलेले बूट, रेनकोट आणि पूर्ण खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

Harihar Fort | Dainik Gomantak

कातळात कोरलेली पाण्याची टाकी

गडमाथ्यावर पोहोचल्यानंतर कातळात कोरलेली थंडगार पाण्याची टाकी आणि तेथील श्री हनुमानाचे मंदिर पर्यटकांचा थकवा क्षणात घालवते.

Harihar Fort | Dainik Gomantak

गडापर्यंतचा थरारक प्रवास

पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून सुरु होणारा हा ट्रेक निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी पावसाळ्यात एक उत्तम पर्याय आहे.

Harihar Fort | Dainik Gomantak

वीकेंडची गर्दी टाळण्यासाठी वेळेचे नियोजन

पावसाळी पर्यटनासाठी येथे मोठी गर्दी होत असल्याने ट्रेकचा खरा आनंद घेण्यासाठी आणि गर्दीपासून वाचण्यासाठी भल्या पहाटे चढाई सुरु करणे सोयीचे ठरते.

Harihar Fort | Dainik Gomantak

Taragad Fort: "जिथं रक्तानं न्हाऊन निघाली बिटली टेकडी!", मुघलांचं साम्राज्य हादरलं; तारागड किल्ल्याचा थरकाप उडवणारा संघर्ष

आणखी बघा