Sameer Amunekar
भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. पण हा दिवस नेमका याच तारखेला का साजरा करतात? चला जाणून घेऊया.
28 फेब्रुवारी 1928 रोजी डॉ. सी. व्ही. रमण यांनी 'रमण इफेक्ट'चा (Raman Effect) शोध लावला होता.
या अभूतपूर्व शोधासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषदेनं (NCSTC) 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
भारत सरकारनं हा प्रस्ताव स्वीकारत 1987 पासून, हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.
प्रकाशाच्या परावर्तनामुळे त्याच्या रंगांमध्ये होणाऱ्या बदलाचा हा महत्त्वाचा शोध होता. 1930 मध्ये याच संशोधनासाठी डॉ. सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक मिळाले
या वर्षी, राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम 'विज्ञान आणि नवोपक्रमात जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम बनवणोट' आहे.