Priyanka Deshmukh
फॅशन आणि स्टाइलच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा खूप पुढे आहेत. स्त्रिया आपला लूक परफेक्ट बनवण्यासाठी अनेक प्रकारचे मेकअप प्रोडक्ट वापरतात.
महिलांचा लूक परफेक्ट आणि क्लासी बनवण्यात लिपस्टिक महत्त्वाची भूमिका बजावते.
प्रसंग कोणताही असो, लिपस्टिक स्टायलिश लुक देण्याचं काम करते.
आज नॅशनल लिपस्टिक डे आहे. आणि तुम्हाला लिपस्टिक शेड्सबद्दल माहिती असणे गरजेचं आहे.
जांभळ्या शेडची लिपस्टिक सध्या ट्रेंडमध्ये आहे. लेट नाईट पार्टी असो किंवा ऑफिस, या रंगाची लिपस्टिक तुम्हाला सर्वत्र स्टायलिश लुक देईल.
पिंक कलरची लिपस्टिक अनेकदा मुलींची पहिली पसंती असते. प्रत्येक वयोगटातील महिलांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक सुट करते.
रिवाइव्हिंग रेड शेडची लिपस्टिक आजकाल महिलांमध्ये खूप पसंत केली जात आहे. या शेडची लिपस्टिक वापरल्यास तुम्हाला मस्त लुक मिळेल.
ऑरेंज कलरची लिपस्टिकही महिलांच्या चेहऱ्यावर खूप उठून दिसते. तुम्हाला परफेक्ट लूक हवा असेल तर शक्यतो फक्त मॅड लिपस्टिक वापरा.
कोरल शेडची लिपस्टिकही सध्या ट्रेंडमध्ये आहे. ज्या महिलांना हलक्या रंगाच्या लिपस्टिक शेड्स वापरायला आवडतात त्यांच्यासाठी या शेड्स अगदी उत्तम आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.