National Film Award पटकावलेला 'सूर्या' कापड कारखान्यात काम करायचा

Priyanka Deshmukh

दक्षिण चित्रपटांचा सुपरस्टार, सूर्याला 'सूरराई पोत्रू' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

Suriya Sivakumar | Facebook/Suriya Sivakumar

पण एक काळ असा होता की या इंडस्ट्रीत ठसा उमटवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली.

Suriya Sivakumar | Facebook/Suriya Sivakumar

चित्रपटसृष्टीशी निगडीत असूनही त्याने खूप संघर्ष केला. सुर्या हा तमिळ अभिनेता शिवकुमारचा मुलगा आहे पण त्याने स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत आपले नाव मोठे केले.

Suriya Sivakumar | Facebook/Suriya Sivakumar

सूर्याला वयाच्या 20 व्या वर्षी चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली होती.

Suriya Sivakumar | Facebook/Suriya Sivakumar

1995 मध्ये त्याला 'असाई' या चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर आली पण सुर्याला चित्रपटांमध्ये रस नव्हता, त्यामुळे त्याने ही ऑफर नाकारली होती.

Suriya Sivakumar | Facebook/Suriya Sivakumar

फिल्मी दुनियेत विशेष रस नसल्यामुळे त्यांने कापडाच्या कारखान्यात काम करायला सुरुवात केली.

Suriya Sivakumar | Facebook/Suriya Sivakumar

तेव्हा त्याने तिथल्या लोकांपासून आपली ओळख लपवून ठेवली होती की तो अभिनेता शिवकुमारचा मुलगा आहे.

Suriya Sivakumar | Facebook/Suriya Sivakumar

सुमारे 8 महिने त्याने कापड कारखान्यात काम केले आणि या कारखान्यातील कामाच्या बदल्यात त्याला दरमहा एक हजार रुपये मिळायचे.

Suriya Sivakumar | Facebook/Suriya Sivakumar

1997 मध्ये दिग्दर्शक वसंत यांच्या 'नेरुक्कू नेर' या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टित पदार्पण केले.या चित्रपटाचे निर्माते मणिरत्नम होते.

Suriya Sivakumar | Facebook/Suriya Sivakumar

साऊथच्या चित्रपटांमध्ये आपले नाव कमावण्यासाठी त्याने खूप मेहनत केली आणि खूप मजल मारली.

Suriya Sivakumar | Facebook/Suriya Sivakumar

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Suriya Sivakumar | Facebook/Suriya Sivakumar