नॅथन लायन 500 विकेट्स घेत दिग्गजांमध्ये सामील

Pranali Kodre

ऑस्ट्रेलियाचा विजय

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध पर्थला झालेल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (17 डिसेंबर 2023) तब्बल 360 धावांनी विजय मिळवला.

Australia Cricket | X/CricketAus

नॅथन लायनच्या विकेट्स

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 2 विकेट्स असे मिळून 5 विकेट्स घेतल्या.

Nathan Lyon | X/ICC

नॅथन लायन @500

त्यामुळे नॅथन लायनच्या कसोटी कारकिर्दीत 500 विकेट्स पूर्ण झाल्या आहेत.

Nathan Lyon | ICC

कसोटी कारकिर्द

नॅथन लायनच्या नावावर आता 123 कसोटीत 501 विकेट्स झाल्या आहेत. यामध्ये त्याने 23 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्ता विकेट्स घेतल्या आहेत, तर 4 वेळा त्याने एका सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

Nathan Lyon | X/ICC

आठवा गोलंदाज

नॅथन लायन आता कसोटीत 500 विकेट्स घेणारा एकूण आठवाच गोलंदाज ठरला आहे, तर तिसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला.

Nathan Lyon | X/cricketcomau

दिग्गज ऑस्ट्रेलियन

लायनपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉर्न (708 विकेट्स) आणि ग्लेन मॅकग्रा (563 विकेट्स) यांनीच 500 कसोटी विकेट्सचा टप्पा ओलांडला आहे.

Shane Warne, Glenn McGrath, Nathan Lyon | X/ICC

500 कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज

दरम्यान, लायन, वॉर्न आणि मॅकग्रा या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांशिवाय मुथय्या मुरलीधरन (800), जेम्स अँडरसन (690), अनिल कुंबळे (619) स्टुअर्ट ब्रॉड (604) आणि कर्टनी वॉल्श (519) या जगभरातील गोलंदाजांनीही 500 हून अधिक कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

500 Test Wicket Takers | X/ICC

भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने पहिल्या वनडेत का घातली गुलाबी जर्सी?

South Africa Pink Jersey | X