Sameer Panditrao
नाशिकपासून १८ किमीवर असलेल्या "गडगड सांगवी" गावाच्या मागे एक डोंगररांग पसरलेली आहे स्थानीक लोक या डोंगररांगेस अंबोली पर्वत या नावाने ओळखतात.
या पर्वत रांगेत तीन शिखरं आहेत, यातले मधले शिखर म्हणजे ‘गडगडा किल्ला’ होय
यातील उजवीकडील शिखराला ‘अंबोली‘ व डावीकडील शिखराला ‘अघोरी’ या नावाने ओळखतात.
किल्ल्याच्या कातळकड्याखालून जाणारी वाट आपल्याला भवानी मातेच्या देवळाकडे घेऊन जाते.
गडगडाकिल्ला व अंबोली पर्वत यामधील खिंडीत पायवाटेने गेल्यावर दगडात खोदलेली ३ फूटी उंचीची गुहा पाहाता येते.
किल्ल्यावर प्रवेशद्वार, देवड्या आणि पाण्याच्या टाक्या पाहता येतात.
गडावरुन डांग्या सुळका, अंजनेरी व वालदेवी डॅम किल्ल्याच्या पश्चिमेला, तर मुंबई - नाशिक महामार्ग , मुकणे डॅम , औंढा, बीतनगड,हे किल्ले व कळसुबाई डोंगररांग दिसते.