Manish Jadhav
आज (25 डिसेंबर) जगभरात ख्रिसमसचं मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन केले जात आहे.
यानिमित्ताने अंतराळ संस्था नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) ने अवकाशातील ख्रिसमस ट्रीचे छायाचित्र शेअर केले आहे. हे NGC 2264 म्हणून ओळखले जाते, जे पृथ्वीपासून 2500 प्रकाशवर्षे दूर आहे.
हा ताऱ्यांचा समूह आहे, जो अगदी ख्रिसमसच्या ट्रीसारखा दिसतो. त्याला 'ख्रिसमस टी क्लस्टर' असेही म्हणतात.
NGC 2264 चा हा नवीन फोटो ताऱ्यांच्या प्रकाशासह वैश्विक वृक्षाचा आकार दाखवतो. NGC 2264 हा खरं तर युवा ताऱ्यांचा समूह आहे, ज्यांचे वय सुमारे एक ते पाच दशलक्ष वर्षे आहे. ते आपल्या आकाशगंगेत पृथ्वीपासून सुमारे 2,500 प्रकाशवर्षे दूर आहे. NGC 2264 मधील तारे सूर्यापेक्षा लहान आणि मोठे आहेत.
नासाने जारी केलेल्या फोटोमध्ये ख्रिसमस ट्रीसारखा हिरवा आकार दिसत आहे. त्याच्या सभोवतालचे चमकणारे तारे ख्रिसमसच्या ट्रीवरील दिव्यासारखे दिसतात.