गोमन्तक डिजिटल टीम
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’चे सौरयान ‘पार्कर सोलर प्रोब’ सूर्याच्या सर्वांत जवळ पोहोचले आहे.
‘पार्कर’नेसूर्याच्या अत्यंत जवळ पोहोचून इतिहास रचला आहे. सूर्याच्या त्याच्या बाह्य वातावरणाबद्दल महत्त्वाची माहिती गोळा करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे
‘पार्कर सोलर प्रोब’ने सूर्याकडे सर्वांत जवळ जात असल्याचे ‘नासा सन अँड स्पेस’च्या ‘एक्स’वरील अधिकृत हँडलवरून सांगण्यात आले.
सूर्याच्या एवढ्या जवळ जाऊन या यानाने त्याचा पूर्वीचा विक्रम मोडला आहे.
पूर्वीच्या मोहिमांच्या तुलनेत हे यान सूर्याच्या सात पट जवळ पोहोचले आहे.
‘पार्कर’ सूर्याजवळून अजून दोनदा उड्डाण करण्याची अपेक्षा आहे.
पार्कर मानवनिर्मित सर्वांत वेगवान वस्तू ठरली आहे.