Sameer Panditrao
नासा-इस्रो सिंथेटिक ॲपर्चर रडार(निसार) हा उपग्रह येत्या ३० जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात येणार.
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संयुक्तविद्यमाने ही मोहीम होत आहे.
जीएसएलव्ही एस१६ या प्रक्षेपकाच्या साहाय्याने प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या या उपग्रहाचे वजन २ हजार ३९२ किलोग्रॅम आहे.
नासाच्या एल बँडचा आणि इस्रोच्या एस बँडचा वापर करून पृथ्वीचे निरीक्षण करणारा हा पहिलाच उपग्रह आहे.
इस्रोच्या सुधारित १३ के सॅटेलाईट बसशी संलग्न असलेल्या नासाच्या मेश रिफ्लेक्टर अँटिनाच्या माध्यमातून हा उपग्रह पृथ्वीचे निरीक्षण करणार आहे.
पृथ्वीपासून ७४० किलोमीटर अंतरावर प्रक्षेपण करणार.
हा उपग्रह दिवस आणि रात्र तसेच कोणत्याही ऋतूमध्ये पृथ्वीचे छायाचित्र काढण्यास सक्षम आहे.