Sameer Amunekar
नळदुर्ग किल्ल्याचा संबंध पुराणकाळातील नल-दमयंतीशी जोडला जातो. नळ राजाने हा किल्ला बांधल्यामुळे त्याचे नाव नळदुर्ग पडले.
हा किल्ला प्रथम चालुक्य राजांच्या ताब्यात होता, त्यानंतर बहामनी सुलतानांकडे गेला. पुढे तो आदिलशाही, मुघल, निजाम आणि शेवटी मराठ्यांच्या ताब्यात आला.
इ.स. 1758 मध्ये नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला जिंकला होता.
इ.स. 1799 मध्ये निजामाने इंग्रजांबरोबर तह केला, ज्यामुळे निजामाचे स्वातंत्र्य संपले आणि इंग्रजांचे हैद्राबादेवर वर्चस्व प्रस्थापित झाले.
नळदुर्ग किल्ल्यावरील नर-मादी धबधबे हे सर्वाधिक प्रसिद्ध असून किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतात.
मुख्य किल्ला आणि रणमंडख या दोन भागांना पाणी महाल जोडतो. हा महाल बोरी नदीवरील दगडी धरणावर उभारलेला आहे.
इब्राहिम आदिलशहा दुसऱ्याने बोरी नदीवर दगडी धरण बांधून पाणी महालाची योजना केली. पावसाळ्यात नदीला पूर आला की या महालातून पाण्याचे दोन धबधबे पडतात, ज्यांना नर व मादी असे म्हटले जाते.