Manish Jadhav
नाहरगड किल्ला राजस्थानची राजधानी 'जयपूर' येथील अरावली पर्वतरांगांवर वसलेला आहे. येथून संपूर्ण जयपूर शहराचे निसर्गरम्य दृश्य दिसते.
या ऐतिहासिक किल्ल्याची निर्मिती 1734 मध्ये जयपूरचे संस्थापक महाराजा सवाई जयसिंग (दुसरे) यांनी शहराच्या सुरक्षेसाठी केली होती.
'नाहरगड' या नावाचा अर्थ 'सिंहाचे स्थान' असा होतो. स्थानिक लोककथेनुसार, राठोड राजकुमार नाहर सिंह यांच्या नावावरुन या किल्ल्याला हे नाव पडले.
या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे 'माधवेंद्र भवन'. महाराजा सवाई माधव सिंह यांनी आपल्या 9 राण्यांसाठी एकसारखे सुंदर आणि भव्य 9 महाल येथे बांधले होते.
नाहरगड किल्ला त्याच्या अद्भुत 'सनसेट व्ह्यू'साठी खूप प्रसिद्ध आहे. संध्याकाळच्या वेळी येथून दिसणारा सूर्यास्त आणि दिव्यांनी उजळून निघणारे जयपूर शहर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.
या किल्ल्याचे सौंदर्य आणि भव्यता पाहून अनेक बॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे. 'रंग दे बसंती' आणि 'शुद्ध देसी रोमान्स' यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दृश्य येथे चित्रित करण्यात आले आहेत.
तुम्ही जर जयपूरला भेट देणार असाल तर ऑक्टोबर ते मार्च हा काळ नाहरगड किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.