Korean Face Pack: चेहऱ्यावर हवाय इन्स्टंट ग्लो? आजच ट्राय करा 'हा' घरगुती कोरियन ब्युटी मास्क; जाणून घ्या सोपी पद्धत

Manish Jadhav

चेहरा टवटवीत दिसतो

बटाट्याच्या रसामुळे त्वचेची सैल झालेली छिद्रे (Pores) घट्ट होण्यास मदत होते, ज्यामुळे चेहरा अगदी टाईट आणि टवटवीत दिसतो.

Korean Face Pack | Dainik Gomantak

चेहऱ्यावरील काळे डाग गायब होतात

बटाट्यामध्ये नैसर्गिक घटक असतात, जे चेहऱ्यावर असलेले काळे डाग, वांग आणि उन्हामुळे झालेला काळेपणा (Tanning) झटपट कमी करतात.

Korean Face Pack | Dainik Gomantak

त्वचेला मिळतो भरपूर ओलावा

कोरफड (Aloe Vera) आपल्या त्वचेला आतून ओलसर आणि हायड्रेट ठेवते. यामुळे त्वचा अजिबात कोरडी पडत नाही आणि मऊ राहते.

Korean Face Pack | Dainik Gomantak

सुरकुत्या होतात कमी

हा फेसपॅक नियमित लावल्यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात, ज्यामुळे चेहरा कायम तरुण आणि फ्रेश वाटतो.

Korean Face Pack | Dainik Gomantak

फेसपॅक कसा बनवायचा?

एका छोट्या वाटीत 1 चमचा ताजा बटाट्याचा रस घ्या आणि त्यात 1 चमचा कोरफडीचा गर व्यवस्थित एकत्र करुन पेस्ट बनवा.

Korean Face Pack | Dainik Gomantak

चेहऱ्यावर कसा लावावा?

तयार केलेली ही जादूई पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर आणि मानेवर नीट लावा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटे पॅक सुकण्यासाठी तसाच सोडून द्या.

Korean Face Pack | Dainik Gomantak

मिळतो इन्स्टंट नॅचरल ग्लो

वेळ पूर्ण झाल्यावर चेहरा साध्या किंवा कोमट पाण्याने धुवून टाका. पहिल्याच वेळेस चेहऱ्यावर छान नैसर्गिक चमक आणि फ्रेशनेस दिसून येईल.

Korean Face Pack | Dainik Gomantak

Diwali Special Rangolis 2026: "अगं बाई, एवढी सुंदर रांगोळी तू काढलीस?", यंदाच्या दिवाळीत ट्राय करा 'या' आकर्षक रांगोळ्या

आणखी बघा