Manish Jadhav
हिवाळ्यात आरोग्याची काळजीबरोबर खाण्या-पिण्याची काळजी घेणंही तेवढचं महत्त्वाचं आहे. मांसाहार करणारे लोक हिवाळ्यात पाया किंवा चिकन सूप पिण्यास प्राधान्य देतात.
आज (5 डिसेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून हिवाळ्यात चिकन आणि मटन यापैकी काय खाणं फायदेशीर आहे ते जाणून घेणार आहोत.
चिकनमध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्व आढळतात. सर्दी, खोकला इत्यादी झाल्यावर चिकन सूप पिणं खूप फायदेशीर ठरतं.
मटणामध्ये फॅट्स आणि मिनरल्स जास्त प्रमाणात आढळतात. हिवाळ्यात थंडी पासून वाचण्यासाठी मटण एक चांगला स्रोत आहे.
चिकनमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते ज्यामुळे चिकन हे पचवण्यास सोपं जातं, त्यामुळे ज्यांना पोटाशी निगडित समस्या आहेत असे चिकन आरामात खाऊ शकतात.
मटणामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे त्याला पचवायला देखील वेळ लागतो. पण यामुळे शरीराला एनर्जी मिळते.