Indian Navy Recruitment: करिअरची नामी संधी; 12वी नंतर नौदलात कशी मिळवाल नोकरी?

Manish Jadhav

नौदलात संधी

जर तुम्हीही भारतीय नौदलात सामील होण्याचे आणि देशाच्या सागरी सीमांचे रक्षक बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही बारावीनंतर नौदल अधिकारी होऊ शकता.

Indian Navy Recruitment | Dainik Gomantak

करिअर

नौदलाने तरुणांना करिअर घडवण्याची उत्तम संधी दिली आहे. चला तर मग 12वी नंतर भारतीय नौदलात नोकरी कशी मिळवली जाते हे जाणून घेऊया...

Indian Navy Recruitment | Dainik Gomantak

NDA/NA परीक्षा

संघ लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अभ्यासक्रमासाठी वर्षातून दोनदा परीक्षा आयोजित करतो. लेखी परीक्षेनंतर एसएसबी मुलाखत घेतली जाते. NDA परीक्षेसाठी वयोमर्यादा 16½ वर्षे ते 19 वर्षे आहे. या परीक्षेला बसण्यासाठी 12वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Indian Navy Recruitment | Dainik Gomantak

10+2 बी.टेक कॅडेट प्रवेश योजना

नौदलात सामील होण्याचा दुसरा मार्ग म्हणजे 10+2 B.Tech कॅडेट प्रवेश योजना. यामध्ये जेईई मेन परीक्षेत चांगली रँक मिळवणाऱ्यांचा समावेश आहे.

Indian Navy Recruitment | Dainik Gomantak

प्रशिक्षण

या योजनेंतर्गत भरती झाल्यावर नौदल अकादमी एझिमाला (केरळ) येथे चार वर्षांचे प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, एखाद्याला अधिकारी पदावर नोकरी मिळते आणि बी.टेक पदवी देखील मिळते.

Indian Navy Recruitment | Dainik Gomantak

अधिकारी

या योजनेद्वारे नौदलात एजुकेशन ब्रांच आणि कार्यकारी व एग्जीक्यूटिव एंड टेक्निकल ब्रांच अधिकारी बनवले जातात.

Indian Navy Recruitment | Dainik Gomantak

पात्रता

10+2 B.Tech कॅडेट प्रवेश योजनेसाठी, 12वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित 70% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, जेईई मेन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. एसएसबी मुलाखतीसाठी कॉल जेईई मेन रँकच्या आधारावर येतो.

Indian Navy Recruitment | Dainik Gomantak

अग्निवीर

बारावी उत्तीर्ण झाल्यावर अग्निवीर म्हणून नौदलातही सामील होऊ शकतो. यासाठी वयोमर्यादा 17 ते 21 वर्षे आहे. नौदलात अग्निवीर होण्यासाठी तुम्ही गणित आणि भौतिकशास्त्रात किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण केलेली असावी. यासाठी बारावीची परीक्षा देणारे उमेदवारही अर्ज करु शकतील.

Indian Navy Recruitment | Dainik Gomantak
आणखी बघा