गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात तुम्ही किनारे, क्लब्स, नाईट पार्टीज तुम्ही पाहिले असतीलच पण गोव्यातील जुन्या ग्रामीण भागाची सुंदरता आपण पाहिली आहे का? तर मारूया काही जुन्या गावांचा फेरफटका.....
शिवोली हे गोव्यातील एक लपलेले रत्न आहे, जे इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचे अनोखे मिश्रण आहे. फेस्टा दी सँटो अँटोनियो हा उत्सव इथे पाहण्यासारखा असतो. विणकाम आणि लाकूडकामासाठी हे गाव ओळखले जाते.
नयनरम्य असे हळदोणा हे गाव पूर्व पोर्तुगीज काळापासून अस्तित्वात आहे. या गावचा नदी परिसर अतिशय मोहक आहे. फेस्टा डे साओ टोमे इथले स्थानिक मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
समृद्ध इतिहासासह असोळणा गाव निसर्गाच्या कृपेने नटलेले आहे. झुआरी नदीचा विलोभनीय नजारा तुम्हाला जवळून अनुभवता येतो. सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त हा इथला महत्वाचा उत्सव आहे.
अस्सल गोवन संस्कृतीचा अनुभव देणारे लोटोली हे गाव आहे. गावातले ऐतिहासिक चर्च आणि पारंपरिक वस्त्या गावाच्या सौन्दर्यात आणखी भर घालतात. फेस्टा डे नोसा सेन्होरा दा सौदे हा इथला वार्षिक उत्सव प्रेक्षणीय असतो.
होंडा हे छोटेसे आणि टुमदार गाव आहे. गावाच्या जवळच १७ व्या शतकातील किल्ल्याचा परिसर आहे. गावाच्या आसपास होणारी पारंपरिक मासेमारी तुम्हाला पाहावयास मिळू शकते. फेस्टा डे साओ फ्रान्सिस्को हा उत्सव ग्रामस्थ साजरे करतात.
चांदोर परिसराचा इतिहास २००० वर्षांपासूनचा आहे. विस्तृत कुरणांमुळे या परिसराची हिरवाई डोळ्यांना आनंद देते. ब्रागांझा हाऊसची सुंदर वास्तूकला तुम्ही येथे पाहू शकता. फेस्टा डे नोसा सेन्होरा दा पिएडेडे हा चांदोरचा वार्षिक फेस्त असतो.
उत्तर गोव्याची तहान भागवणारे 'तिळारी' धरण