गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात खाण्यापिण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कुळागरांमध्ये हमखास मिळणारा नारळाशिवाय गोव्यातील जेवणाचं पान अपूर्ण असतं.
सर्वात महत्वाचं म्हणजे गोव्यात पाव-भाजी नाही तर भाजी-पाव खाल्ला जातो. चण्याची आमटी, बटाट्याची भाजी आणि सोबत तळलेली मिरची यानेच सकाळची सुंदर सुरुवात होते.
इत्रत कुठेही न मिळणारे कढीचे पोहे गोव्याची खासियत आहे. पोह्यांमधे मिसळलेला खोबऱ्याचा रस यांना बाकी पोह्यांच्या प्रकारांपेक्षा वेगळं बनवतो.
दुपारच्या जेवणात भाजलेले मासे आणि भाजी आमटी असतेच, मात्र इथलं जेवण अपूर्ण आहे ते भाताशिवाय.
नारळाची काहीच टंचाई नसल्याने गोव्यातील जेवणात खोबरं टाकलंच जातं. जेवणानंतर येणारी सोलकढी ही पचनाला मदत करते.
तवश्याची (काकडीची) तवसोळी, नाचणीचे सत्व, दोदोल, बिबिन्का हे काही गोव्यातील खास गोड पदार्थ म्हणून ओळखले जातात.
काही सण समारंभ असल्यास खतखतं, चण्याची आमटी हे पदार्थ नक्कीच बनतात. गोव्यातील खास पदार्थांची चव चाखायची असेल तर इथे भेट दिल्याशिवाय पर्याय नाही.
मग खमंग मसाले आणि खोबऱ्याच्या रसाचा तिखट-गोड अनुभव घेण्यासाठी एक गोव्याची सहल झालीच पाहिजे..