Famous Spots In Konkan: पावसात फुललेलं कोकण; 'या' 5 ठिकाणी भेट दिली नाही, तर खूप काही मिस कराल

Sameer Amunekar

पावसाळा म्हणजे कोकणातील निसर्गाची खरी उधळण! हिरवाई, धबधबे, ओलसर मातीचा सुवास आणि थोडं थोडं रिमझिम पावसात फिरणं. याचा अनुभव घेण्यासाठी कोकणातली काही ठिकाणं खासच असतात.

Famous Spots In Konkan | Dainik Gomantak

आंबोली

पावसाळ्यात अंबोलीमध्ये धबधब्यांचा अक्षरशः वर्षाव होतो. धुकं, हिरवळ आणि आल्हाददायक थंडी यामुळे हा घाट पावसाळी पर्यटनासाठी स्वर्गासारखा वाटतो.

Famous Spots In Konkan | Dainik Gomantak

दापोली

समुद्रकिनार्‍याचं सौंदर्य, शांतता आणि पावसात चहूकडून वाहणारे झरे – हे सर्व दापोलीला खास बनवतात.

Famous Spots In Konkan | Dainik Gomantak

मुरूड-हर्णे समुद्रकिनारा

पावसात समुद्राचा रौद्र आणि मनमोहक असा दुहेरी स्वभाव पाहायला मिळतो. समुद्रकिनार्‍यावर फिरणं, गार वाऱ्यात बसणं – हा अनुभव अविस्मरणीय असतो.

Famous Spots In Konkan | Dainik Gomantak

गणपतीपुळे

गणपतीपुळे हे निसर्गसौंदर्य आणि धार्मिक श्रद्धेचं अनोखं मिश्रण आहे. येथे समुद्रकिनाऱ्यालगत वसलेलं स्वयंभू गणपतीचं मंदिर हे मुख्य आकर्षण. पावसाळ्यात समुद्राची उधळण, ओलसर वारा, आणि गर्द हिरवाई हे इथलं वातावरण खूपच शांत आणि मन प्रसन्न करणारं असतं.

Famous Spots In Konkan | Dainik Gomantak

देवकुंड धबधबा, देवगड

निसर्गाच्या कुशीत लपलेला, घनदाट जंगलातून वाट काढून गाठावा लागणारा हा धबधबा पावसाळ्यात चैतन्याने भरलेला असतो. खळखळणारा पाण्याचा प्रवाह, सभोवताली दाट झाडी आणि मनमोहक शांतता यामुळे हे ठिकाण 'हिडन जेम'सारखं आहे.

Famous Spots In Konkan | Dainik Gomantak
Famous Waterfall In Konkan | Dainik Gomantak
येथे क्लिक करा