Manish Jadhav
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला टुमदार गोवा पर्यटकांना आकर्षित करतो.
गोव्यात येणारा पर्यटक इथल्या गोवन मसल्यांमधील खाद्यपदार्थांची चव चाखल्याशिवाय राहू शकत नाही.
गोव्यात मिळणारे अफलातून स्ट्रीट फूड पर्यटकांना वेड लावतात. रोस आम्लेट, गडबड आईस्क्रिम, फ्रॅंकीचा आस्वाद तुम्ही आवर्जून घेतला पाहिजे.
गोव्यातील गडबड आइस्क्रीम देखील तुम्ही नक्की ट्राय करा. गडबड आइस्क्रीममध्ये अनेक फ्लेव्हर असतात. एका मोठ्या ग्लासात गडबड आइस्क्रीम दिले जाते. यामध्ये फालूदा, शेवई, जेली किंवा जॅम टाकून खास अंदाजात लोकांना दिले जाते.
फ्रँकी हे उत्तर गोव्याचे उत्कृष्ट स्ट्रीट फूड आहे. हा एक लोकप्रिय नाश्ता आहे. फ्रँकीमध्ये स्टफिंगचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये भाज्या, सोया चंक्स, अंडी आणि चिकन इत्यादींचा समावेश आहे.