Manish Jadhav
पावसाळा सुरु झाला की आरोग्याबरोबर आहाराची काळजी घ्यावी लागते.
त्यामुळे पावसाळ्यात काही भाज्यांचे सेवन करणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. आज (19 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाणे टाळावे याविषयी जाणून घेणार आहोत...
पावसाळ्यात कांदा आणि लसूण यासारख्या भाज्यांचे सेवन देखील कमी केले पाहिजे.
पावसाळ्यात भरपूर ओलावा असतो, ज्यामुळे मशरुम लवकर कुजते. कुजलेल्या मशरुममुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते.
पावसाळ्यात फुलकोबीचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
पावसाळ्यात वांग्यांला लवकर किड लागते, ज्यामुळे अन्न विषबाधा किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.