Sameer Amunekar
मुरूड जंजिरा किल्ला सुमारे २२ एकरांमध्ये पसरलेला असून त्याच्या परिसरात २२ सुरक्षा चौक्या आहेत.
या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी २२ वर्षांचा वेळ लागला.
३५० वर्षांहून अधिक काळ हा किल्ला अजेय राहिला आहे; शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटीश सर्वांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाही यश आले नाही.
शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी जवळच दुसरा किल्ला उभारला, तरीही जंजिरावर मात करता आली नाही.
मजबूत बांधकाम, प्रगत इंजिनिअरिंग तंत्र, देखणं स्थापत्य आणि सामरिकदृष्ट्या अचूक जागा या सर्व वैशिष्ट्यांमुळे किल्ला अत्यंत ठोस आहे.
हा किल्ला मुंबईपासून सुमारे १६५ किमी दक्षिणेला, रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात अरबी समुद्रात एका बेटावर वसलेला आहे. मुरुड गावापासून ४–५ किमी अंतरावर राजपुरी गावाजवळ आहे.
किल्ला सिद्दींनी बांधला होता आणि ‘जंजिरा’ हा शब्द अरबी शब्द ‘जजिरा’ पासून आला असून याचा अर्थ “बेट” असा होतो.