Sameer Amunekar
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी, समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे.
पण याच सिंधुदुर्गातील एक ठिकाणं प्रेमीयुगुलांसाठीही एक खास आकर्षण ठरले आहे.
धामापूर तलाव हा तलाव सिंधुदुर्गातील सर्वात मोठ्या व सुंदर गोड्या पाण्याच्या तलावांपैकी एक आहे.
येथे शांत वातावरण, हिरवीगार झाडे आणि तलावावर उमटणाऱ्या संध्याकाळच्या सुर्यकिरणांची जादू पाहताना कोणाच्याही मनाचा ठाव घेतात.
लांब पसरलेला हा तलाव निसर्गरम्य दृश्यांनी सजलेला आहे.
तलावाभोवती उंच झाडांची रांग, त्यावर बसलेले पक्षी, आणि वाऱ्याने डुलणारे पाण्याचे तरंग हे दृश्य पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करतात.
शांतता आणि निसर्गाची जवळीक यामुळे धामापूर तलाव प्रेमीयुगुलांचे खास अड्डा मानला जातो.