गोमन्तक डिजिटल टीम
गोवा आणि मुंबई दोन्ही भारतातील लोकप्रिय स्थळे आहेत.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित गोवा किनारी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे.
दोन्हीकडे मात्र उष्ण आणि दमट हवामान असते.
गोव्यात तुलनेने शांत जीवन, आरामदायक वातावरण तर मुंबई - व्यापारासाठी प्रसिद्ध आणि गतिमान जीवनशैलीसाठी ओळखले जाते.
गोव्यातील समुद्रकिनारे, किल्ले, चर्च ,वॉटर स्पोर्ट्स आणि अलीकडे नाईट लाईफ तर मुंबई ऐतिहासिक स्थळे, निवडक समुद्र किनारे, पब, मॉल्स, चित्रनगरी लोकांना आकर्षित करते.
दोन्हीकडे मासे आवडीने खाल्ले जातात. गोव्यात सोलकढी, बेबिंका, पातोळेसारखे स्थानिक पदार्थ मिळतात. मुंबईत देशभरातील लोक असल्याने पाणीपुरी, वडापाव, पावभाजी अशी भरपूर रेंज मिळते.
छोटे आणि संपन्न राज्य असल्याने गोव्यात कमी लोकसंख्या, स्वच्छ पर्यावरण आहे. मुंबईत अधिक लोकसंख्या दिसून येते.