Pramod Yadav
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्वात लांब अटल सेतू पुलाचे उद्घाटन करून लोकार्पण केले.
शिवडी - न्हावाशेवा या 22 किलोमीटर लांबीच्या पुलावरून मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 15 मिनिटांत कापता येणार आहे.
मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (MTHL) 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावाशेवा अटल सेतू' असे नाव देण्यात आले आहे.
अटल सेतूमुळे पुणे, गोवासह दक्षिण भारतातील प्रवासही कमी वेळेत पूर्ण होणार आहे.
अटल सेतूवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले 190 सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.सहा पदरी
या सहा पदरी पुलावरून दररोज 70 हजारांहून अधिक वाहने ये-जा करू शकतात.
या पुलासाठी आयफेल टॉवरपेक्षा 17 पट अधिक आणि कोलकात्याच्या हावडा ब्रिजमध्ये चारपट स्टील वापरण्यात आले आहे.