Akshata Chhatre
भारताची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई. अनेकांसाठी हेच शहर स्वप्नांची नगरी आहे पण ही स्वप्नांची राजधानी एक हुंड्यात दिलेलं शहर आहे. पण मुंबईला हुंड्यात दिलं तरी कोणी आणि का? चला जाणून घेऊया.
इंग्लंडच्या राजा चार्ल्स दुसरा याचा विवाह पोर्तुगीज राजकन्या कॅथरिन ऑफ ब्रगांझा हिच्याशी झाला. १६६१ साली झालेल्या या राजकीय विवाहात मुंबई शहराला हुंड्यात देण्यात आलं होतं.
१६६१ साली बॉम्बेची बेटं, जी आताची मुंबई आहे त्या शहराला पोर्तुगालने इंग्लंडला हुंड्यात दिलं होतं. त्या वेळी मुंबई म्हणजे फक्त काही बेटं एवढाच भाग होता.
राजा चार्ल्स दुसऱ्याने ही बेटं १६६८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला केवळ दरवर्षी १० पाउंडच्या किमतीने भाड्याने दिली.
ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईला मोठं व्यापारी केंद्र बनवलं. हे शहर हळूहळू ब्रिटिश भारताचं आर्थिक हृदय बनायला सुरुवात झाली.
स्वातंत्र्यानंतरही शहराचा विकास थांबला नाही आणि १९९५ साली, बॉम्बेला दिलं गेलं नविन नाव होतं ते म्हणजे मुंबई.