WPL 2024: मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ

Pranali Kodre

वूमन्स प्रीमियर लीग 2024

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धा (WPL 2024) 23 फेब्रुवारीपासून चालू झाली आहे. यंदा या स्पर्धेचा दुसरा हंगामत खेळवला जात आहे.

WPL Trophy | X/Giant_Cricket

मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये

डब्ल्युपीएलच्या दुसऱ्या हंगामातही मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यात यश मिळवले आहे.

Mumbai Indians | WPL 2024 | ANI

पहिला संघ

गतविजेता मुंबई इंडियन्स संघ डब्ल्युपीएलच्या दुसऱ्या हंगामात प्लेऑफ गाठणारा पहिला संघ ठरला आहे.

Mumbai Indians | WPL 2024 | PTI

तीन संघ प्लेऑफमध्ये

डब्ल्युपीएलमध्ये सहभागी पाच संघांचे एकूण प्रत्येकी 8 सामने खेळून झाल्यानंतर गुणतालिकेत पहिल्या तीन क्रमांकावरील संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतात.

Mumbai Indians | WPL 2024 | PTI

मुंबई इंडियन्सचे गुण

त्यामुळे मुंबई इंडियन्सने डब्ल्युपीएलच्या दुसऱ्या हंगामात 7 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह पहिल्या तीनमधील स्थान पक्के केल आहे.

Mumbai Indians | WPL 2024 | PTI

शेवटचा साखळी सामना

मुंबई इंडियन्सचा साखळी फेरीतील एक सामना बाकी आहे. हा सामना 12 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध होणार आहे.

Mumbai Indians | WPL 2024 | PTI

प्लेऑफची स्वरुप

डब्ल्युपीएलच्या नियमानुसार साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल क्रमांकवर राहणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करतो, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघात एलिमिनेटरचा सामना खेळवला जातो. या सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात पोहचतो.

Mumbai Indians | WPL 2024 | PTI

IND vs ENG, Test: यशस्वी जयस्वाल ठरला मालिकावीर, पाहा कामगिरी

Yashasvi Jaiswal | AFP