IPL 2024: मुंबईचा ग्रीन आता विराटचा टीममेट

Pranali Kodre

लिलाव

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर २०२३ रोजी पार पडणार असून त्यापूर्वीच एक मोठी बातमी 27 नोव्हेंबर 2023 रोजी समोर आली आहे.

हार्दिक मुंबईत, पण ग्रीन बेंगलोरमध्ये

मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्याला दोन वर्षांनंतर गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून संघात घेतले आहे, याचबरोबर अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीनला मात्र रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ट्रेड केले आहे.

Cameron Green | X

महागडा खेळाडू

ग्रीनला मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात 17.5 कोटींची बोली लावत संघात घेतले होते. तो मुंबई इंडियन्सचा सर्वात महागडा खेळाडूही ठरला.

Cameron Green | X

ट्रेडिंग

मात्र, यंदा आयपीएल 2024 साठी हार्दिकला संघात घेताना मात्र मुंबईला ग्रीनला ट्रेड करावे लागले आहे.

Cameron Green | X

अष्टपैलू खेळाडू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा ग्रीन कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी सक्षम असून वेगवान गोलंदाज म्हणूनही चांगला पर्याय उपलब्ध करून देतो.

Cameron Green | X

आयपीएल पदार्पण

ग्रीनने आयपीएलमध्ये 2023 साली मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते.

Cameron Green | X

कामगिरी

ग्रीनने आयपीएल 2023मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 16 सामन्यांत 50.22 च्या सरासरीने 452 धावा केल्या, ज्यात एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. याशिवाय त्याने 6 विकेट्ही घेतल्या.

Cameron Green | X

विराटचा टीममेट

आता ग्रीन आयपीएल 2024 मध्ये फाफ डू प्लेसिस कर्णधार असलेल्या आणि विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल अशा खेळाडूंचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना दिसणार आहे.

Cameron Green | X/RCBTweets

IPL 2024: हार्दिकची दोन वर्षांनी मुंबई इंडियन्समध्ये 'घरवापसी'

Hardik Pandya | X
आणखी बघण्यासाठी