IPL 2024: हार्दिकची दोन वर्षांनी मुंबई इंडियन्समध्ये 'घरवापसी'

Pranali Kodre

आयपीएल 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर २०२३ रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वीच एक मोठी बातमी २७ नोव्हेंबर २०२३ रोजी समोर आली आहे.

हार्दिकची घरवापसी

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या ट्रेडिंगबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा अखेर खरी ठरली आहे. हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली आहे.

Hardik Pandya | X

हार्दिकचे ट्रेडिंग

मुंबई इंडियन्सने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. गुजरातने हार्दिकला मुंबईबरोबर ट्रेड केले आहे.

Hardik Pandya | X

आयपीएल पदार्पण

हार्दिकने 2015 साली मुंबई इंडियन्सकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी मुंबईने त्याला 10 लाखांच्या किंमतीत संघात संधी दिली होती.

Hardik Pandya | X

विजेतेपद

हार्दिक 2015, 2017, 2019 आणि 2020 साली आयपीएल विजेतेपद मिळवलेल्या मुंबई संघाचाही भाग होता.

Hardik Pandya | X

मुंबई इंडियन्ससाठी कामगिरी

हार्दिकने मुंबई इंडियन्सकडून 2015 ते 2021 दरम्यान 92 सामन्यांमध्ये 1476 धावा केल्या. तसेच 51 विकेट्स घेतल्या होत्या.

Hardik Pandya | X

गुजरातबरोबर करार

मात्र, 2022 आयपीएलपूर्वी मुंबईने त्याला संघातून करारमुक्त केले होते. त्यामुळे गुजरात टायटन्सने त्याला 15 कोटींच्या किंमतीत संघात घेत कर्णधारपदही दिले.

कर्णधारपद

त्यामुळे हार्दिक 2022 आणि 2023 हंगामात गुजरातचा कर्णधार होता.

नेतृत्व

त्याने 2022 मध्ये गुजरात संघाला आयपीएलचे विजेतेपदही जिंकून दिले होते. तसेच आयपीएल 2023 मध्येही त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात अंतिम सामन्यात पोहचला, पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Hardik Pandya | X

दोन वर्षांनी पुन्हा मुंबईच्या कुटुंबात

आता पुन्हा एकदा दोन वर्षांनी हार्दिकची मुंबई इंडियन्स संघात घरवापसी झाली आहे.

Hardik Pandya | X/MIPaltan

IPL 2024 लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?

IPL Trophy | IPL
आणखी बघण्यासाठी