Sameer Panditrao
सिंधुदुर्गात वैभववाडी तालुक्यात समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर वैशिष्ट्यपूर्ण ऐनारी गुहा आहे.
या ऐनारी गावात गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा आहे. हाच तो बकासुराचा प्रदेश आणि वाडा आहे असे म्हणतात.
येथे कोणत्याही खुणा नाहीत पण युद्धात वापरल्यामुळे इथे मोठे वृक्ष नाहीत अशी दंतकथा सांगितली जाते.
या कथेच्या काही पाऊलखुणा ऐनारीत दाखविल्या जातात. बकासुराच्या वाडय़ाचा चौथरा दाखवला जातो.
ज्या भागात बकासुराचे भ्रमण असायचे तो भाग आज राकसवाडा म्हणून प्रचलित आहे. या जंगल परिसराला हे नाव कसे पडले, कोणी ठेवले याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत
मुंबई-गोवा महामार्गावरून भुईबावडा घाटातून ४ किमी आत ऐनारी गाव आणि गुहा आहेत
ऐनारी गावात राकसवाडापासून अलीकडच्या भागात काही ग्रामस्थांनी घरे बांधली आहेत. या घरांसाठी खोदकाम करताना काही अंतरावर प्राचीन साहित्य मिळाल्याचे गावकरी सांगतात.