Sameer Panditrao
रत्नागिरीहून गणपतीपुळ्याला जाताना एक भन्नाट ठिकाण लागते.
हे ठिकाणी म्हणजे आरेवारे रस्ता .
समुद्राचे अथांग रूप आणि बाजूने जाणारा रस्ता यामुळे हे ठिकाण स्वप्नवत भासते.
रत्नागिरीतून आरेवारे १५ किमी अंतरावरती आहे.
गणपतीपुळेतून हे अंतर १७ किमी इतके आहे.
मावळणारा सूर्य, निळाशार सागर आणि सोबत चहा घेत इथे वेळ चांगला जातो.
मुंबई गोवा हायवेतून इथे एका तासात पोचता येते.